ज्ञानदेव: एक जीवन व्यवस्थापन गुरू
अलंकापुर निवासी श्री ज्ञानदेव अर्थात संत ज्ञानेश्वर माऊलींंची प्रतिभा अनाकलनीय आणि अवर्णनीय अशीच आहे. ज्ञानदेवांच व्यक्तिमत्व त्यांच्या काळात व उत्तरकाळात अत्यंत लोकप्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळत. अगदी आजही "ज्ञानदेव तुकाराम" हा महामंत्र ज्ञानदेवांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. खरंतर माऊलींचं एका शब्दात वर्णन करायचं ठरलं तर माउली म्हणजे महाराष्ट्राचं हृदयच होत. म्हणून ज्ञानदेवांवर प्रेम करणाऱ्या तत्कालीन व उत्तरकालीन सर्व संतांना ज्ञानदेवांचं मुक्तकंठाने गुणगाण केल्याविना राहावलच नाही. खरंतर ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व कुठल्याही शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. कारण तिथे कोणतेही शब्द कमीच पडतील ! कारण शब्दाला आणि शब्दज्ञानाला मर्यादा ठरलेलीच ठरलेलीच असते. आणि ज्ञानदेव तर अमर्याद असुन अत्यंत व्यापक आहेत. आणि ही गोष्ट ज्ञानदेवांच्या काळातील तसेच उत्तर काळातील सर्व संतांनी मान्य केली. परंतु तरीही ते सर्व माऊलींचं वर्णन करण्यास उद्युक्त झाले. दशेची वाट न पाहता मुळात बालपणीच सर्वज्ञ असलेले ...