हीच खरी "गुरू-दक्षिणा "
वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक , स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांनी सन १९१७ साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही केवळ एक शिक्षण संस्था नव्हे तर अध्यात्मज्ञानाची अविरत वाहणारी गंगाच म्हणावी लागेल !स्थापने नंतर एक शतक पूर्ण करुन दुसऱ्या शतकातही या ज्ञानगंगेचे वाहणे सुरुच आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिकता जपण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे.महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहासात जोग महाराजांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल. तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे "पुर्व पुण्य ठेवा ओढवला " या न्यायाने व पूर्वजांच्या पुण्या ई ने या ज्ञानगंगेत ४ वर्षे गुरुजनांच्या सानिध्यात अवगाहन करण्याचा योग प्राप्त झाला. संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले आदर्श गुरुजन. वैराग्य-भक्ती-ज्ञान या त्रिगुणांचा अंगीकार केलेली ही सर्व मंडळी. अगदी जोग महाराजांपासून तर सांप्रत कालच्या गुरुजनांपर्यंत सर्वच मंडळी हिमालयाच्या तोडीची आहे. या लेखाच्या निमित्ताने ...