पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सार्थ पाण्डुरङ्गाष्टकम्

इमेज
।।पाण्डुरङ्गाष्टकम्।।  महायोगपीठे तटे भीमरथ्या  वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।1।         महायोगाचे अधिष्ठान (पीठ), भीमा नदीच्या तीरावर ज्याला पंढरपुर क्षेत्र म्हणतात अशा क्षेत्री आई वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी , अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्म रूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. तडिद्वाससं नीलमेघावभासं    रमामन्दिरं सुंदरं चित्प्रकाशम्। वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुगम्।2।         विद्युल्लतेसम अतीशय शोभिवंत असे वस्त्रे नेसणार्‍या,नीळ्यारंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या अंगकांतीच्या , लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या,परम सुंदर चित्प्रकाशी,सर्वश्रेष्ठ तसेच भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून अभा आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्। विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोषः परब्रह्म लिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।3...