पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बोधसंपन्न रामचंद्र बाबा बोधे.....

इमेज
प.पू.श्रीगुरु रामचंद्र बाबा बोधे यांचा पुण्यतिथी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी साजरा करत आहे. त्यानिमित्ताने बाबांच्या चरणी शब्द कुसुमांजली... मी २०१५ साठी पंढरपूरला चातुर्मासात होतो.श्रीगुरू बोधे बाबांच्या मठात वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य श्रीगुरु वै.निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे प्रवचन सुरू होते. वक्ते  बाबांनी प्रवचनासाठी                   महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: l         भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम् ll हा गीतेतील श्लोक निवडला. सदर प्रसंगी बाबांनी श्लोकातील "महात्मा" या पदाला प्राधान्य देऊन संपूर्ण प्रवचन केले. त्यावेळेच वक्ते बाबांचं एक वाक्य याठिकाणी उद्धृत करावसं वाटतं... "हल्ली लोक कुणालाही महात्मा म्हणतात पण खरा महात्मा आमचे बोधे बाबा आहेत;कि जे दैवी सद्गुण संपत्तीने युक्त आहेत." श्रीगुरु बोधे बाबांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सहवासात काल घालवला असेल, त्या त्या प्रत्येकाला आपलं जीवन सार...