पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण काय शिकलो ?

इमेज
मी माझी दिवाळी आळंदीत आल्यापासून माऊलींच्या सानिध्यातच साजरी करतो. त्यामुळे दिवाळीला गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण यावर्षी दिवाळीच्या अगोदर गााावातील एक व्यक्ती मयत झाल्याने दशक्रिया विधीसाठी गावी गेलो होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर लगेच काल सकाळी मी आळंदीला येण्यासाठी कोपरगावच्या बसस्थानकावर आलो. तिथे आल्यानंतर सुसज्ज आणि सुव्यवस्थित बांधलेलं भव्य बसस्थानक पाहून आनंद वाटला. पण नंतर हा विचार मनात आला की सध्याच्या परिस्थितीत बरेच एसटी कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. पगाराच्या व वेतन वाढीच्या समस्यांमुळे त्रस्त होऊन आत्महत्या हत्येसारख्या  प्रवृत्त होताना दिसत आहे. मग बसस्थानकांची काम कशी सुरू आहेत ? ज्यांच्या खांद्यावर राज्य परिवहन महामंडळाची धुरा असते अशा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का?          असो...   मी सकाळी ९ च्या सुमारास कोपरगाव आगाराच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. दिवाळीचा काळ असल्याने कोपरगावलाच गाडी पूर्ण भरली. पुढे शिर्डी, बाबळेश्वर, लोणी असे एक-एक स्थानक गाडी पुढे जात असताना प्रत्येक स्थानका...