शिक्षण क्षेत्रातील लढवय्या
शिक्षणक्षेत्रातील लढवय्या....... प्रिय वाचक मित्रांनो,आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद परदेशी सर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. परदेशी सर म्हणजे एक लढवय्या, मेहनती, संशोधक, अंधश्रद्धा निर्मूलक, कर्तव्यपरायण, रंजल्या-गांजल्यांना आपलंसं करून त्यांना चांगल्या मार्गावर आणणारं अनंत गुणविशेषांनी नटलेलं व्यक्तिमत्व ! नेमके कोण आहे हे परदेशी सर ? काय त्यांचं कार्य आहे ? यांच्याबद्दल जरा विस्ताराने जाणून घेऊ या ! * परीचय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणजे प्रमोद परदेशी सर. मुळगाव कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे. घरातच शिक्षकी पार्श्वभूमी लाभलेलं हे व्यक्तिमत्व. वडील जि. प. शाळेत मुख्याध्यापक व बहीणही शिक्षिका. यामुळे सहजच शिक्षकी पेशाकडे वळलेला हा तरूण. बारावीपर्यंत आपल्या मुळगावी शिक्षण घेऊन पुढे ठाण्यातील उल्हासनगर येथे नॅशनल कॉलेज मध्ये डी.एड. शिक्षण घेतले. 2002 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू. *दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्य करताना..... इगतपुरी पासून 14 किलोमीटर अंतर...