शिक्षण क्षेत्रातील लढवय्या
शिक्षणक्षेत्रातील लढवय्या.......
प्रिय वाचक मित्रांनो,आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद परदेशी सर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
परदेशी सर म्हणजे एक लढवय्या, मेहनती, संशोधक, अंधश्रद्धा निर्मूलक, कर्तव्यपरायण, रंजल्या-गांजल्यांना आपलंसं करून त्यांना चांगल्या मार्गावर आणणारं अनंत गुणविशेषांनी नटलेलं व्यक्तिमत्व !
नेमके कोण आहे हे परदेशी सर ? काय त्यांचं कार्य आहे ? यांच्याबद्दल जरा विस्ताराने जाणून घेऊ या !
* परीचय
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणजे प्रमोद परदेशी सर. मुळगाव कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे. घरातच शिक्षकी पार्श्वभूमी लाभलेलं हे व्यक्तिमत्व. वडील जि. प. शाळेत मुख्याध्यापक व बहीणही शिक्षिका. यामुळे सहजच शिक्षकी पेशाकडे वळलेला हा तरूण. बारावीपर्यंत आपल्या मुळगावी शिक्षण घेऊन पुढे ठाण्यातील उल्हासनगर येथे नॅशनल कॉलेज मध्ये डी.एड. शिक्षण घेतले. 2002 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू.
*दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्य करताना.....
इगतपुरी पासून 14 किलोमीटर अंतरावर भावली धरणाच्या डोंगरावरती डोंगरावरती सुमारे एक ते दीड कि.मी. पायी प्रवास करून येते ती ती बीनरस्त्याची ३५०-४०० लोकसंख्या असलेली आदिवासी समाजाची धामडकीवाडी.
मूल्यमापनासाठी सर प्रश्नपत्रिका बनवून त्या स्वयंसेवकाकडे देत व त्यांना त्या विषयी सूचना देऊन विद्यार्थ्यांकडून त्या सोडवून घेतल्या गेल्या व नंतर "स्फ्रुह्यल फाऊंडेशनच्या" मार्फत स्वाध्याय पुस्तिका मिळवून 10 शाळांना दिल्या.
* सहकार्य वृत्ती
गावात शिक्षक म्हणून कार्य करताना केवळ अध्यापनाचे काम सरांनी केले असे नाही तर गावातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन, आरोग्य लाईट, पाणी इत्यादी संबंधी ही मदत सर गावकऱ्यांना करतात. गावातील एका महिलेला बैलाने मारले असता तिला गंभीर दुखापत झाली असताना नाशिकला आपले मित्र, पत्रकार, झेडपी सदस्य यांची मदत घेऊन त्या महिलेला मदत केली. त्यात महिलेचे प्राण सरांमुळेच वाचू शकले यामुळे गावातील लोक सरांना देवदूतच समजतात. सगळे शिक्षक रविवारच्या सुट्टीची वाट पाहत असतात मात्र परदेशी सर रविवारीही शाळा भरून त्या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या मुंबईच्या लोकांना शाळेत घेऊन जात. त्यांना तिथल्या अडचणी सांगत, गावकर्यांशी त्यांचा संवाद करून, गावकऱ्यांना कोरोणा काळात एप्रिल ते ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा किराणा सामान प्राप्त करून दिले. मुंबईचा लोकांची मदत घेऊन पाण्याची टाकी गावात बसवली. बोरवेल केला गेला त्यामुळे पाण्याची समस्या मिटली.
सर गावातील गावकऱ्यांशी मिळून-मिसळून राहून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करतात त्यामुळे सर हे कोणी वेगळे नसून आपल्यातीलच एक आहे अशी प्रत्येकाच्या मनात प्रेमाची भावना आहे
*अंधश्रद्धा निर्मूलन
सर भगतवाडी शाळेत जेव्हा शिक्षक म्हणून रुजू झाले तेव्हा तिथली शाळा ही पूर्वीच्या स्मशानभूमीच्या जागेवर बांधली गेली असल्यामुळे आणि त्यातच आदिवासी समाज हा अशिक्षित व अंधश्रद्धाळू असल्याने शाळेला भुताटकीची शाळा असं म्हणत. तिथे मुलांना शाळेत पाठवत नसत. पूर्वीच्या शिक्षकांनी व अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करूनही त्यांना याबद्दल यश आले नाही मुलांना शाळेत पाठवले जात नव्हते.
तिथे आल्यानंतर सरांना ही सगळी परिस्थिती समजली पण सर मात्र सहजासहजी माघार घेणारे नव्हते . त्यांनी एक युक्ती लढवली पालकांची अंधश्रद्धा घालवण्यासाठी त्यांनी श्रद्धेचा वापर केला. शाळेत गणपती बसवण्यास सुरुवात केली केली आणि त्यांना सांगितलं की आता आपण इथं देवाला आणलं आहे .इथं देव आल्यानंतर इथं भूत कसं राहणार ! अशा प्रकारे समजून दिले दिले. तिथे त्यांना टेप लावून लावून देऊन लावून देऊन रात्री मनोरंजनाची व्यवस्था केली. वाडी वरचे लोक गणपतीचे दिवसांमध्ये रात्री गणपतीचे दिवसांमध्ये आपले नृत्य, आपले कलाप्रकार सादर करायचे. सकाळी आल्यानंतर सरांनी विचारलं तुम्ही किती वाजेपर्यंत होते? दोन अडीच पर्यंत ! तुम्हाला काय वाटलं का भूत वगैरे ? तर ते नाही म्हणायचे . म्हणजे अशाप्रकारे सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही केलं केलं कार्यही केलं केलं.
सुरुवातीच्या काळात विद्यार्थी शाळेत थांबत नसेल तर सर खांद्यावर उचलून घेऊन पोरांना शाळेत बसवायचे नंतर खेळ नाचगाणी अशाप्रकारे मनोरंजन करून व नंतर शिक्षणाच्या प्रवाहात सरांनी विद्यार्थ्यांना आणलं आणलं
*विचार परिवर्तन
भगतवाडी गावातील पाचवीच्या पुढे कोणीही शिकलेला नव्हता. कोणीही पास झाला नव्हता . सरांनी सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची विनंती केली आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद देऊन आपली मुलं पुढे शिकवायला सुरुवात केली. आज सरांचे काही विद्यार्थी बीएससी झाले, आयटीआय ,इंजिनिअरिंग या क्षेत्रांमध्ये क्षेत्रांमध्ये शिकत आहेत.
*बालविवाह थांबवला
सर कार्यरत असणाऱ्या या आदिवासी वाड्यांमध्ये मुलींचे बालपणीच विवाह केले जायचे. सरांनी सर्व ग्रामस्थांना ,आपल्या सहकारी शिक्षिका मनीषा वाळवे यांना बरोबर घेऊन मार्गदर्शन केले त्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन होऊन तेच लोक मुलींना दहावी बारावी पर्यंत शिकवत आहेत व नंतर त्यांचा विवाह करत आहेत.
*प्रामाणिकपणा
खरं तर सर ज्या आदिवासी भागामध्ये शिक्षक म्हणून रुजू आहे त्या ठिकाणी त्यांचं कार्य बघण्यासाठी कुणी नाही. त्यावर त्यांना जाब विचारणारं कोणीही नाही तरीपण एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून सर आपले काम मेहनतीने पार पाडत आहेत. आणि खऱ्या अर्थाने हिंदी वाक्प्रचाराप्रमाणे "जंगल मे मंगल" असंच सरांचं कार्य आहे आहे.
आदिवासी समाजाला विश्वासात घेऊन, त्यांची बोलीभाषा शिकून , त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन, वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ,आदिवासी समाजातील मुलांना कशाप्रकारे चांगले शिक्षण शिक्षण देता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे "प्रमोद परदेशी सर" आहेत. परदेशी सरांचे हे कार्य पाहून आपल्यालाही जणूकाही उत्तर सापडल्यासारखे वाटते आदिवासी गावाशी एकरूप होऊन शिक्षणाला गती कशी देता येते हे सरांच्या कार्यातून कार्यातून शिकायला मिळते आणि सरांच्या असीम कार्याला वंदन करून त्यांना शुभेच्छा देतो. असेच उत्तम कार्य सरांच्या हातून घडो व माझ्यासारख्या भावी शिक्षकांना सरांकडून मार्गदर्शन लाभून प्रेरणा मिळत राहो.
धन्यवाद....
संदर्भ - शिक्षणगप्पा मूलाखत युट्युब
https://youtu.be/ctVnc3zmyPs
......संकलन व लेखन...
दिपक नवनाथ शिंदे पाटिल(मो.९६७३०६०५६९) Mail - dipakshinde9673@gmail.com।
अप्रतिम... खुपच सुंदर लेख आहे महाराज... 😊 👌👌👌💐💐💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाVery nice good job 👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा