सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....


या जगात जेव्हा तत्वज्ञानाचा विचार होतो तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते युनानचा प्रसिद्ध तत्वज्ञ सॉक्रेटिस याचं. सॉक्रेटिस हा आपल्या प्रगल्भ विचार शैलीमुळे जगविख्यात आहे.... आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा त्याच्या आयुष्यातील प्रसंग सांगितला जातो.
    सॉक्रेटिसची कीर्ती ऐकून एकदा एक युवक त्याच्याकडे आला आणि त्याने साक्रेटीस ला प्रश्न विचारला . गुरुजी ! आपल्या सफल रहस्य काय आहे ? मीसुद्धा आपल्यासारखाच यशस्वी होऊ इच्छितो ! मी तुमची सर्वच्या सर्व पुस्तके वाचले आहेत. तुम्ही सांगितलेल्या मार्गाचा मी स्वीकारही केला आहे पण तरीही मी आपल्या सारखा यशस्वी होऊ शकलो नाही. माझ्या मध्येच काही कमीपणा तर नाही ना ? मला  सफल  का होता येत नाहीये?  त्यावर सॉक्रेटिस म्हणाला उद्या जवळच्या नदीकाठावर ये! मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर सांगतो.
          तो युवक दुसऱ्या दिवशी उत्साहाने नदीच्या किनाऱ्यावर आला. सॉक्रेटिस त्याला म्हणाला - चल आपण नदीत स्नान करू या! तेव्हा तरुण म्हणतो - गुरुजी ! मी  स्नान करण्यासाठी नाही आलो तर आपल्या कडून ज्ञानग्रहण करण्यासाठी आलो आहे. तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला - मी हे ज्ञान तुला केवळ पाण्यातच देऊ शकतो दोघांनी नदी प्रवेश केला सॉक्रेटिस त्याला छाती एवढ्या पाण्यापर्यंत घेऊन गेला. तेव्हा तो तरुण सॉक्रेटिसला - गुरुजी आता बस  झालं !  इथे मी स्नान करण्यासाठी आलेले नाही. सॉक्रेटिस त्याला म्हणाला- आपण अजून थोडंस पाण्यात जाऊया दोघेही गळ्यापर्यंत पाणी असलेल्या ठिकाणी गेले . नंतर सॉक्रेटिस ने अचानक त्या तरुणाच्या मानेला धरुन त्याला पाण्यात बुडवले. तरुण पाण्यातून डोकं वर काढू लागला. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु सॉक्रेटिस शरीराने मजबूत असल्यामुळे त्याच्या पुढे त्या तरुणाचा  शक्ती उपयोगात येत नव्हती .परंतु जीव वाचविण्यासाठी तो तरुण पुन्हा पुन्हा पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला .पण सॉक्रेटिसने पुन्हा त्या तरुणाच्या खांद्याला पकडले आणि त्याला पाण्यात बुडवले . तो तरुण श्वास व्यवस्थित घेऊ शकत नव्हता. बाहेर येण्या करता तडफडू लागला पण सॉक्रेटिसने ताकद लावून त्याला पाण्यात बुडवून ठेवलं. आता तो तरुण काही क्षणात मरेल अशी स्थिती निर्माण झाली. श्वास घेण्यासाठी तो अतिशय तडफडू लागला .मग त्या तरुणाने आपल्या शरीरातील सगळी शक्ती एकत्र केली आणि पूर्ण शक्तीनिशी धक्का दिला. सॉक्रेटिस बाजूला पडला  आणि तो तरुण पटकन पाण्याच्या बाहेर निघाला. आता साक्रेटीसही पाण्यातुन बाहेर आला. आणि म्हणाला- मित्रा तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल! तेव्हा तो तरुण मोठा श्वास घेत बोलला  आज  तर तुम्ही मला मारलं असतं! बरं झालं मी कसं तरी वाचून तुमच्या हातून सुटुन पळालो. तेव्हा सॉक्रेटिस त्याला म्हणतो -मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाण्यात बुडवले तेव्हा तू बाहेर का आला नाहीस. तेव्हा तो तरुण म्हणतो - तुमची शक्ती माझ्या पेक्षा जास्त असल्यामुळे! सॉक्रेटीस पुन्हा विचारतो की दुसऱ्या वेळेस तू पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हाही तू बाहेर का येऊ शकला नाहीस ? आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा मी जेव्हा तुला पाण्यात दाबलं तेव्हा तू बाहेर कसा निघालास? त्यावर तो तरुण म्हणतो पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस मी माझ्या शक्तीचा वापर केला पण तो सीमित होता .आणि तिसऱ्या वेळेस जेव्हा माझ्या लक्षात आलं की मी आता जर पाण्यातून बाहेर पडलो नाही तर मी निश्चित मरणार ! म्हणून मला काहीही करून स्वतःला वाचवणे गरजेचे होतं. मग मी माझे सर्व शक्ती एकवटली आणि त्या शक्तीचा उपयोग करून तुम्हाला बाजूला ढकलून बाहेर आलो .
   तेव्हा सॉक्रेटिस म्हणतो - हेच आहे सफलतेच रहस्य !आपल्यातील शक्ती ओळखता आली पाहिजे . तू तुझ्या मध्ये मध्ये असलेली सर्व शक्ती एकवटून आपल्या साध्य प्राप्तीसाठी प्रयत्न करशील तेव्हा तू सुद्धा माझ्या सारखाच यशस्वी होशील तू सुद्धा माझ्यासारखा कीर्ती संपन्न होशील!
आपण कोणत्याही कार्य सिद्धीसाठी जेव्हा पूर्ण शक्तीनिशी, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तेव्हा आपल्याला यशापासून कोणीही रोखू शकत नाही
"असाध्य ते साध्य करिता सायास l
    कारण अभ्यास तुका म्हणे ll"
........धन्यवाद......
             दिपक नवनाथ शिंदे
             (मा.विद्यार्थी वा. शि.संस्था. आळंदी दे.)
           संपर्क ७६६६६८४०६०

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...