तुका वैकूंठासी गेला....
शूर ओळखावा रणी। साधू ओळखावा मरणी ।। - ही सूक्ति आपण सर्वजण नेहमीच ऐकत असतो. अर्थात तिचा अर्थही तसाच महत्वपूर्ण आहे. एखाद्या शूराचं शूरत्व हे रणांगनातच कळत असतं. शूराला युद्ध स्थळी आलेलं मरण हे त्याच्या शूरपणाला साजेसं असतं. त्यातूनच त्याच्या शूरत्वाची ओळख ठरत असते. अगदी याचप्रमाणे साधू पुरुष ओळखायचा असेल तर तो त्याच्या अंत:समयावरुनच ! महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहेे. त्यातील सर्व संतांच्या अंत:समयाचा विचार करता सामान्य पुरुषांप्रमाणे त्यांचा अंतकाळ नाही तर तो अलौकिक अशा प्रकारचा महाराष्ट्रवासियांनी अनुभवलेला आहे. आणि तोच आपला यथार्थ इतिहास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला, सोपान काकांनी सासवडला तर निवृत्तीनाथ महाराजांनी त्र्यंबकेश्वरला संजीवन समाधी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. तसेच मुक्ताई आकाशी लुप्त झाल्याचे संत वाङ्मयात दाखले आहेत. संत नामदेवांच्या कुटुंबातील १४ जणांनी एकाच वेळी पांडुरंगाच्या महाद्वारी समाधी स्वीकारलेली आहे. चोखोबांची हाडं सुद्धा त्यांच्या मृत...