तुका वैकूंठासी गेला....

शूर ओळखावा रणी। साधू ओळखावा मरणी ।।
- ही सूक्ति  आपण सर्वजण नेहमीच ऐकत असतो. अर्थात तिचा अर्थही तसाच महत्वपूर्ण आहे. एखाद्या शूराचं शूरत्व हे रणांगनातच कळत असतं. शूराला युद्ध स्थळी आलेलं मरण हे त्याच्या शूरपणाला साजेसं असतं. त्यातूनच त्याच्या शूरत्वाची ओळख ठरत असते. अगदी याचप्रमाणे साधू पुरुष ओळखायचा असेल तर तो त्याच्या अंत:समयावरुनच !
       महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहेे. त्यातील सर्व संतांच्या अंत:समयाचा विचार करता सामान्य पुरुषांप्रमाणे त्यांचा अंतकाळ नाही तर तो अलौकिक अशा प्रकारचा महाराष्ट्रवासियांनी अनुभवलेला आहे. आणि तोच आपला यथार्थ इतिहास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला, सोपान काकांनी सासवडला तर निवृत्तीनाथ महाराजांनी  त्र्यंबकेश्वरला  संजीवन समाधी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते.  तसेच मुक्ताई आकाशी लुप्त झाल्याचे संत वाङ्मयात दाखले आहेत.  संत नामदेवांच्या कुटुंबातील १४ जणांनी एकाच वेळी पांडुरंगाच्या महाद्वारी समाधी स्वीकारलेली आहे. चोखोबांची हाडं सुद्धा त्यांच्या मृत्यूपश्चात विठ्ठल विठ्ठल म्हणताना नामदेवांनी अनुभवली. त्या नंतरच्या फळीतले पैठणनिवासी श्रीसंत एकनाथ महाराज गोदामाईच्या कुशीत सामाविष्ट होऊन जलसमाधी स्वीकारतात. महापुरुषांचा अंतसमय हा अलौकिकच असतो.
एकंदरीत यासर्व प्रसंगांचा विचार करता प्रसंगांचा विचार करता या सर्व महापुरुषांच्या जीवनाची सामान्य मनुष्य म्हणून तुलना करून महात्म्यांचा अलौकिकत्व नाकारणे हे शुद्र बुद्धीच्या पुरुषाचं लक्षण आहे. गीतेतही भगवान अशांना मुर्ख म्हणून संबोधतात.
          अवजानन्ति मां मूढा मानुषिं तनुमाश्रिता : l
           परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ll
अगदी याच प्रमाणे संत महापुरुष हे देखील अवतारी कोटीतील असतात. आणि सामान्य बुद्धीच्या पुरुषांची फसगत इथेच होत असते की ते त्यांना सामान्य, आपल्यासारखेच देहधारी मनुष्य समजत असतात.पण याकरीता आमचे तुकोबाराय आधीच सांगून जातात की,  
समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणू नये लिंगा ।
          संत नव्हती जगा । माणसाच्या सारीखे ।।
‌नदी कितीही मोठी झाली तरी ती समुद्र होऊ शकत नाही, कोणत्याही सामान्य पाषाणाला शिवलिंग म्हणता येणार नाही, त्याच प्रमाणे सामान्य माणसाची तुलना संत जीवनाशी करता जीवनाशी करता जीवनाशी करता येणार नाही.
‌ अगदी याच प्रमाणे जगद्गुरुंचं जीवन हे सामान्य तार्किक बुद्धीवाद्याच्या शुद्र बुद्धीच्या कक्षेच्या कितीतरी पलीकडचं अलौकीक विलोभनीय असंच.महाराजांचे समकालीन अनगड शहा फकीर म्हणतात ,
तुका तुला रामसे ,एक नाम दो अंग l
उनका सेतु भंग गया इनका सेतु अभंग ll 

तुकाराम महाराजांची प्रभू श्रीरामाची तुलना केली असता नावे दोन आहेत पण तत्व मात्र एकच आहे. हा ! फरक मात्र एवढाच आहे की, प्रभू रामाचा पाषाण सेतू भंग पावला असून तुकारामांचा अभंग सेतू आजही अस्तित्वात आहे. आणि आजही या अभंग सेतूच्या आधारे अनेक वारकरी भवसागराच्या पैलतीरी पोहोचत आहे.


‌खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या बुद्धीला विष्णूस्वरूप तूकोबा कळणंच अशक्य आहे. वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब दांडेकर सांगायचे,
पोरांना थोर कधीही कळत नसतात पण पोरांना जर थोर कळावे असं वाटत असेल तर त्यांनीही थोर होणे गरजेचं आहे.
‌तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण l
‌ तरीच महीमान येईल कळो ll
‌तुकोबा कळावे असं वाटत असेल तर त्याआधी तुकोबा होणं गरजेचं गरजेचं होणं गरजेचं आहे. आणि तुकोबा होण्याकरता दिवस-रात्र विठ्ठल नाम गाऊन गाऊन  कोट्यावधी जन्म पांडुरंगाला समर्पित करावे लागतात. तेव्हा कुठे तुकोबा जन्माला येतात. त्यामुळे आपल्या सारख्यांनी सारख्यांनी ऐकणेच बरे !
‌     तुकोबांना जाणून घ्यायचं ते कोणत्या मार्गाने ? कारण तुकोबा होऊन मग तुकोबांना जाणने तर अशक्यच आहे ; कारण आपली पात्रता रंका हुन रंक अशीच आहे. अशा अवस्थेत आपणास सर्वांना एकच पर्याय उरतो तो तुकोबांच्या समकालीन वा उत्तरकालीन संतांनी तुकोबांच्या बद्दल काय वर्णन केलेलं आहे ? तुकोबांबद्दल संतांनी केलेलं ते वर्णन मुळात पाहणे गरजेचे आहे.तेव्हाच यथार्थ  रूपाने तुकोबा आपल्या लक्षात येतील.
‌        अशा अलौकिक जीवन असणाऱ्या जगदगुरूंच्या आयुष्यातील अद्भुत घटना म्हणा किंवा संपूर्ण आयुष्य विठ्ठल स्मरणाचा जो दिवस-रात्र अट्टाहास धरला होता त्याचा परिपाक म्हणजेच महाराजांचा प्रयाणकाल होता. मुळात ते आले कुठून होते तर ते संपूर्ण आयुष्यभर सांगत होते की ,
आम्ही वैकुंठवासी l आलो याचि कारणासी l
बोलीले जे रुषी l साच भावे वर्ताया ।।
‌        आणि मुळात माणसाचा स्वभाव असतो की तो कितीही फिरला तरी शेवटी मात्र आपापल्या घरी जात असतो. आणि महाराजांना हि आपल्या घरी जाण्याची ओढ लागली होती तसा त्यांना संतांचा निरोपही आला होता.
आपुल्या माहेरा जोईन मी आता ।
निरोप या संता हाती आला ।l
हा अभंग पूर्ण पाहिला तर आपल्याला तर आपल्याला तर आपल्याला महाराजांची अवस्था काय झाली होती ते लक्षात येईल! आणि या सर्व गोष्टी महाराज देहूवासियांनाही वेळोवेळी सांगत होते की मी जाणार आहे ! जाणार आहे ! पण महाराजांच्या शब्दांची कोणीही गांभीर्याने दखल घेतली नाही.
  शेवटी फाल्गुन वद्य द्वितीयेला आज आपण ज्याला तुकाराम बीज असे संबोधतो या दिवशी, देहूवासियांच्या उपस्थितीत ,गरुड रूपी विमानात बसून दुपारी ठीक १२ वाजता मानव देह घेऊन वैकुंठधामाला गेले. आणि या गोष्टीचे कथन करणारे कित्येक समकालीन संतांचे अभंग आहेत. शासकीय बाडांमध्येही यांची नोंद झालेली आहे. महत्त्वाचा दाखला महाराजांचे शिष्योत्तम असलेले श्री संत निळोबाराय महाराज आपल्या रचनेतून देतात.
प्रयाण काळी देवे विमान पाठविले l कळीच्या काळामाजी अद्भूत वर्तविले l मानवदेह घेऊनी निजधामा गेले l निळा म्हणे सकळ संता तोषविले ll
      यात निळोबारायांनी वापरलेला *अद्भूत" या शब्दाचा अर्थ यथार्थपणे जाणून घेतला म्हणजे जगद्गुरुंना समजून घेण्यात मदत होईल !
      बीजे निमित्त  सर्व वारकरी बांधवांना अनंत शुभेच्छा.
राम कृष्ण हरी...!
पंढरीचा वारकरी दिपक नवनाथ शिंदे 
     (B.A.SANSKRIT ,B.Ed)
       संपर्क -७६६६६८४०६०


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....