आपण काय शिकलो ?
मी माझी दिवाळी आळंदीत आल्यापासून माऊलींच्या सानिध्यातच साजरी करतो. त्यामुळे दिवाळीला गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण यावर्षी दिवाळीच्या अगोदर गााावातील एक व्यक्ती मयत झाल्याने दशक्रिया विधीसाठी गावी गेलो होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर लगेच काल सकाळी मी आळंदीला येण्यासाठी कोपरगावच्या बसस्थानकावर आलो. तिथे आल्यानंतर सुसज्ज आणि सुव्यवस्थित बांधलेलं भव्य बसस्थानक पाहून आनंद वाटला. पण नंतर हा विचार मनात आला की सध्याच्या परिस्थितीत बरेच एसटी कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. पगाराच्या व वेतन वाढीच्या समस्यांमुळे त्रस्त होऊन आत्महत्या हत्येसारख्या प्रवृत्त होताना दिसत आहे. मग बसस्थानकांची काम कशी सुरू आहेत ? ज्यांच्या खांद्यावर राज्य परिवहन महामंडळाची धुरा असते अशा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का?
असो... मी सकाळी ९ च्या सुमारास कोपरगाव आगाराच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. दिवाळीचा काळ असल्याने कोपरगावलाच गाडी पूर्ण भरली. पुढे शिर्डी, बाबळेश्वर, लोणी असे एक-एक स्थानक गाडी पुढे जात असताना प्रत्येक स्थानकावर गाडीत प्रवासी चढल्याने गाडीत पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. लोणीच्या पुढे अचानक गाडी थांबली. तीथे महामंडळाच्या दुसऱ्या एका गाडीत काहीतरी बिघाड झाल्याने चालक व वाहक गाडी बाजूला लावून सर्व प्रवास्यांना घेऊन रस्त्यावर थांबले होते. गाडीत जागा शिल्लक नसतानाही रिक्षावाले रिक्षात प्रवासी कोंबतात त्याप्रमाणे गाडीत माणसं कोंबली गेली. आमची गाडी पुढे चालू लागली. चढलेल्या प्रवाशांमध्ये बहुतांश महिला होत्या. मी गाडीच्या मधोमध डाव्या बाजूला खिडकी शेजारच्या सीटवर बसलो होतो . माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. शेजारीच चढलेल्या प्रवाशांपैकी असलेली एक पंचवीस-सव्वीस वर्षाची तरुणी होती. तिच्या वेशावरून उच्चशिक्षित असावी.तिने आम्हाला "सीटवर बसण्यासाठी जागा द्या"अशी विनंती केली! आम्ही तीला बहिणीप्रमाणे समजून थोडसं सरकून बसण्याकरता जागा केली. गाडी संगमनेरच्या बसस्थानकावर आली. गाडीत चढण्यासाठी जागाच नसल्याने खाद्यपदार्थ विकणाऱ्या मंडळींना गाडीत घुसणे शक्य नसल्याने ते गाडीच्या भोवती फिरत होते. आमच्या शेजारी बसलेल्या त्या मुलीने बटाट्याचे व्हेपर्स , कुरकुरे वगैरे काही पदार्थांचे पाकिटं खाण्यासाठी घेतले. त्या मुलीचं खाणं आणि गाडीचं चालणं सुरू झालं! बस किंवा रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ खात असताना शेजारच्या व्यक्तीला "घ्या आणि खा"अशी माणुसकी कोणीही शक्यतो पाळत नाही. आणि या गोष्टीचं खाणाऱ्याला व शेजाऱ्याला काही वाटतही नाही.गाडी चालत होती पुढचा थांबा येईपर्यंत तिने ती तिनही पाकीट खाऊन संपवली. तिने ती "तीनही पाकीट खिडकीतून बाहेर रस्त्यावर फेकली". माझ्या ही गोष्ट लक्षात आली. आता बोलून काही फायदा नव्हता. मी काहीच बोललो नाही.
घडलेल्या प्रकारावर मी मनातच विचार करायला लागलो की आपण सगळेजण शिकलेलो असतानाही असं अडाण्यासारखं का वागतो? आणि खरंच आपण शिक्षित आहोत का ? कचऱ्याच्या , प्रदूषणाच्या समस्यांवर आपण शाळा- कॉलेजमधून अनेक पाठ शिकलेलो आहोत , ते फक्त प्रश्नोउत्तर लिहिण्यासाठी वा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच होते का ? आपण का हळू बदल करत नाही ? आपण वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या , खाद्यपदार्थांचे पाकिटं आपण कुठलाही विचार न करता सर्रास सार्वजनिक ठिकाणी टाकून देतो.आणि सार्वजनिक ठिकाणे कचऱ्याने युक्त आहेत अशी तक्रार करून शासनाला दोष देणारेही आपणच असतो. हा आपला सर्वांचाच बेजबाबदारपणा आहे. बस, रेल्वेगाड्या,रस्ते आणि इतरही सार्वजनिक ठिकाणांमध्ये आपल्याला कितीतरी कचरा पाहायला मिळतो याचं कारण काय तर आपलाच बेजबाबदारपणा! तो आपल्याला लक्षात यायला हवा.
"आपण बदललो तरच जग बदलेल"!
आता ह्याला काय म्हणावं ? ती पिशवी मी तीथून काढून नंतर कचऱ्यात टाकली..... या सगळ्या प्रसंगावरून एकच प्रश्न्न निर्माण होतो "आपण काय शिकलो ?" ✒️दिपक शिंदे
खरंतर आत्मप्रशंसा करणे चुकीचे आहे तरी पण सांगतो मी बऱ्याचदा प्रवास करतो. प्रवासात वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या, किंवा खाल्लेल्या खाद्यपदार्थांची पाकिटं बरोबर असलेल्या शबनम पिशवीतून घरी घेऊन येतो व नंतर कचऱ्यात टाकतो. तसेच शक्य असल्यास तीथेच कचरा कूंडीत टाकतो. अर्थात सर्वांनीच या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.नंतर मी माझ्या आजूबाजूला बसमध्ये निरीक्षण केलं. शेजारी खिडकीला असणाऱ्या फटीमध्ये सुद्धा कोणीतरी खाल्लेल्या खाद्यपदार्थांची पिशवी खोसली होती.
आता ह्याला काय म्हणावं ? ती पिशवी मी तीथून काढून नंतर कचऱ्यात टाकली..... या सगळ्या प्रसंगावरून एकच प्रश्न्न निर्माण होतो "आपण काय शिकलो ?" ✒️दिपक शिंदे
खुप छान गुरुजी . माझी माऊली म्हणते. हे विश्व माझे घर , हा विचार घेऊन जगणारा माणूस कधीच कुठेही घाण करणार नाही .
उत्तर द्याहटवा