ज्ञानदेव: एक जीवन व्यवस्थापन गुरू
खरंतर ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व कुठल्याही शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. कारण तिथे कोणतेही शब्द कमीच पडतील ! कारण शब्दाला आणि शब्दज्ञानाला मर्यादा ठरलेलीच ठरलेलीच असते. आणि ज्ञानदेव तर अमर्याद असुन अत्यंत व्यापक आहेत. आणि ही गोष्ट ज्ञानदेवांच्या काळातील तसेच उत्तर काळातील सर्व संतांनी मान्य केली. परंतु तरीही ते सर्व माऊलींचं वर्णन करण्यास उद्युक्त झाले.दशेची वाट न पाहता मुळात बालपणीच सर्वज्ञ असलेले ज्ञानदेव वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानदेवीची अर्थात ज्ञानेश्वरीची रचना करून आपलं अलौकिकत्व सिद्ध करतात.
खरंतर यापेक्षा अलौकिकता काय असेल जीवनामध्ये! बऱ्याच जणांना आपण आयुष्यभर जगतो, ते कशासाठी जगतो आणि त्यातून साध्य काय करायचं ते मरेपर्यंत समजत समजत सुद्धा नाही. सामान्य माणूस जोपर्यंत मरण येेत नाही तोपर्यंत बिना हेतूचा जगत असतो. परंतु महापुरुषांच, संतांचं वेगळेपण हेच आहे कि ,ते या अवनीतलावरती अवतीर्ण होताना आपल्याला करावयाचा कार्यभाग ठरवून मगच अवतरतात. आणि विशिष्ट वेळेत आपला कार्यभाग साधून इहलोकीची यात्रा संपवतात.म्हणून तर भगवद्पूज्यपाद शंकराचार्य ३२ वर्षे,विवेकानंद ३९ ,तुकाराम महाराज ४२,
छत्रपती शिवाजी महाराज ५० वर्षे तर ज्ञानदेव सर्वात कमी म्हणजे २२ वर्षे या लोकात जनमानसासमक्ष होते.
ज्ञानदेवांच अलौकिकत्व हे आहे की, वयाच्या २२व्या वर्षी स्वच्छेने संजीवन समाधी स्विकारणारे ज्ञानदेव हे जगातील एकमेव महापुरुष आहेत.
मानवी जीवनाचं व्यवस्थापन कसं असावं ? त्यात वेळेला किंमत किती असावी ? हे माऊलींच्या जीवनातून जीवनातून सर्वांना शिकण्यासारखं आहे. माऊलींचे श्रीगुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज माऊलींंबद्दल सांगताना म्हणतात की "जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे केला" खऱ्या अर्थाने २२ व्या वर्षापर्यंत जीवन म्हणजे काय आहे हेच कळत नाही तिथं बावीसाव्या वर्षीच माऊलींनी जीवनाची सार्थकता , कृतकृत्यता साधलेली आहे. खऱ्या अर्थाने तरुणांचा हा काळ म्हणजे कॉलेजात उनाडपणा करण्याचा ! याच अवधीत मात्र माऊलींचं जीवन संपन्न,सफल झालेलं दिसतं. माऊलींना आदर्श मानणाऱ्या माऊलींवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक तरुणाने माऊलींच्या ठाई असलेला जीवन व्यवस्थापन गुण आत्मसात करून जीवनामध्ये समयाला अत्यंत महत्त्व देऊन समय सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करावा.
तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानदेवांचा अनुयायी म्हणण्याचा अधिकार प्राप्त होईल!
राम कृष्ण हरी...
पंढरीचा वारकरी दिपक शिंदे ...
Abhyas purvak lekh aahe.
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर... तुम्हा सर्व गुरुजनांच्या कृपेचा प्रसाद आहे हा !
हटवासुंदर लेखनी चालते बोवा आपली.
उत्तर द्याहटवालिहीत रहा.....
धन्यवाद महाराज !
हटवाउत्तम
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखुपच छान दिपक म..रामकृष्णहरि
उत्तर द्याहटवाधन्यवाद माऊली
हटवासूत्रबद्ध🖋️👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद महाराज
हटवा