ज्ञानदेव: एक जीवन व्यवस्थापन गुरू

अलंकापुर निवासी श्री ज्ञानदेव अर्थात संत ज्ञानेश्वर  माऊलींंची प्रतिभा अनाकलनीय आणि अवर्णनीय अशीच आहे.  ज्ञानदेवांच व्यक्तिमत्व त्यांच्या काळात व उत्तरकाळात अत्यंत लोकप्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळत. अगदी आजही "ज्ञानदेव तुकाराम" हा महामंत्र ज्ञानदेवांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. खरंतर माऊलींचं एका शब्दात वर्णन करायचं ठरलं तर माउली म्हणजे महाराष्ट्राचं हृदयच होत. म्हणून ज्ञानदेवांवर प्रेम करणाऱ्या तत्कालीन व उत्तरकालीन सर्व संतांना ज्ञानदेवांचं मुक्तकंठाने गुणगाण केल्याविना राहावलच नाही.
    खरंतर ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व कुठल्याही शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. कारण तिथे कोणतेही शब्द कमीच पडतील ! कारण शब्दाला आणि शब्दज्ञानाला मर्यादा ठरलेलीच ठरलेलीच असते. आणि ज्ञानदेव तर अमर्याद  असुन अत्यंत व्यापक आहेत. आणि ही गोष्ट ज्ञानदेवांच्या काळातील तसेच उत्तर काळातील सर्व संतांनी मान्य केली. परंतु तरीही ते सर्व माऊलींचं वर्णन करण्यास उद्युक्त झाले.दशेची वाट न पाहता मुळात बालपणीच सर्वज्ञ असलेले ज्ञानदेव वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानदेवीची अर्थात ज्ञानेश्वरीची रचना करून आपलं अलौकिकत्व सिद्ध करतात.
माऊलींचं जीवन अनेक चमत्कृतीपूर्ण प्रसंगांनी नटलेलं असलं तरी ज्ञानेश्वरीची रचना हाच माऊलींच्या जीवनातील श्रेष्ठतम चमत्कार आहे .आणि वयाच्या बाविसाव्या वर्षी आपलं इहलोकातील कर्तव्य संपलं म्हणून संजीवन समाधी स्वीकारतात.
   खरंतर यापेक्षा अलौकिकता काय असेल जीवनामध्ये! बऱ्याच जणांना आपण आयुष्यभर जगतो, ते कशासाठी जगतो आणि त्यातून साध्य काय करायचं ते मरेपर्यंत समजत समजत सुद्धा नाही. सामान्य माणूस जोपर्यंत मरण येेत नाही तोपर्यंत बिना हेतूचा जगत असतो. परंतु महापुरुषांच, संतांचं वेगळेपण हेच आहे कि ,ते या अवनीतलावरती अवतीर्ण होताना आपल्याला करावयाचा कार्यभाग ठरवून मगच अवतरतात. आणि विशिष्ट वेळेत आपला कार्यभाग साधून इहलोकीची यात्रा संपवतात.म्हणून तर भगवद्पूज्यपाद शंकराचार्य ३२ वर्षे,विवेकानंद  ३९ ,तुकाराम महाराज ४२,
छत्रपती शिवाजी महाराज ५० वर्षे  तर ज्ञानदेव सर्वात कमी म्हणजे २२ वर्षे या लोकात जनमानसासमक्ष होते.
      ज्ञानदेवांच अलौकिकत्व हे आहे की, वयाच्या २२व्या वर्षी स्वच्छेने संजीवन समाधी स्विकारणारे ज्ञानदेव हे जगातील एकमेव महापुरुष आहेत.

मानवी जीवनाचं व्यवस्थापन कसं असावं ? त्यात वेळेला किंमत किती असावी ?  हे माऊलींच्या जीवनातून जीवनातून सर्वांना शिकण्यासारखं आहे. माऊलींचे श्रीगुरु असणारे निवृत्तीनाथ महाराज माऊलींंबद्दल सांगताना म्हणतात की "जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे केला"  खऱ्या अर्थाने २२ व्या वर्षापर्यंत जीवन म्हणजे काय आहे हेच कळत नाही तिथं बावीसाव्या वर्षीच माऊलींनी जीवनाची सार्थकता , कृतकृत्यता साधलेली आहे. खऱ्या अर्थाने तरुणांचा हा काळ म्हणजे कॉलेजात उनाडपणा करण्याचा !  याच अवधीत मात्र माऊलींचं जीवन संपन्न,सफल झालेलं दिसतं. माऊलींना आदर्श मानणाऱ्या माऊलींवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक तरुणाने माऊलींच्या ठाई असलेला जीवन व्यवस्थापन गुण आत्मसात करून जीवनामध्ये समयाला अत्यंत महत्त्व देऊन  समय सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करावा.
   तरच खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानदेवांचा अनुयायी म्हणण्याचा अधिकार प्राप्त होईल!

राम कृष्ण हरी...

  पंढरीचा वारकरी दिपक शिंदे ...

#संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मदीर
आळंदी देवाची

टिप्पण्या

  1. सुंदर लेखनी चालते बोवा आपली.
    लिहीत रहा.....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....