वेद मार्गे मुनी गेले....
वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालीलो ! भारतीय इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू धर्मावर परकीय परधर्मीयांची आक्रमणं झाली. बरेचदा अन्याय-अत्याचार किंवा प्रलोभन देऊन हिंदू धर्मियांच्या धर्मांतरासाठी अनेक प्रयत्न झाले. समाज सुधारणेच्या नावाखाली तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली तथाकथित धर्मसुधारकांनी व पुरोगाम्यांनी हिंदू धर्म साकल्याने जाणून न घेता आपल्या अर्धवट बूद्धीद्वारे दोष देण्याचे काम केले. या परधर्माच्या व नास्तिकतेच्या वावटळातही वेदानुसारी असलेला हा धर्म दीपज्योतीवत् दीप्तीमान राहीला. वेदाप्रमाणेच अनंत काळापासून प्रवाही आहे. आणि पुढेही प्रवाही राहील! म्हणूनच त्यासाठी सनातन हा शब्द वापरला आहे. त्या शब्दातच त्याचं शाश्वतत्व टिकून आहे. "सर्वे भद्राणि पश्यन्तु" द्वारे सर्व मानवजातीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या या धर्माने कधीही धर्मवृद्धीसाठी...