वेद मार्गे मुनी गेले....

वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालीलो !

भारतीय इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू धर्मावर परकीय परधर्मीयांची आक्रमणं झाली. बरेचदा अन्याय-अत्याचार किंवा प्रलोभन देऊन हिंदू धर्मियांच्या धर्मांतरासाठी अनेक प्रयत्न झाले.                                          समाज सुधारणेच्या नावाखाली तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली तथाकथित धर्मसुधारकांनी व पुरोगाम्यांनी हिंदू धर्म साकल्याने जाणून न घेता आपल्या अर्धवट बूद्धीद्वारे दोष देण्याचे काम केले.    
या परधर्माच्या व नास्तिकतेच्या वावटळातही वेदानुसारी असलेला हा धर्म दीपज्योतीवत् दीप्तीमान राहीला. वेदाप्रमाणेच अनंत काळापासून प्रवाही आहे. आणि पुढेही प्रवाही राहील! म्हणूनच त्यासाठी सनातन हा शब्द वापरला आहे. त्या शब्दातच त्याचं शाश्वतत्व टिकून आहे.
       "सर्वे भद्राणि पश्यन्तु" द्वारे सर्व मानवजातीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या या धर्माने कधीही धर्मवृद्धीसाठी अन्याय - अत्याचार व प्रलोभनाचं धोरणही स्विकारलं नाही. पण ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली त्यावेळेस  शिवबा राणाप्रतापांसारखे अनेक धर्मधूरंधर महाप्रतापी धर्मपुत्र निर्माण झाले.आणि धर्म राखला. याचा अनुनय करणाऱ्यांनी कधीही कूणावर अत्याचार केला नाही.जर धार्मिक म्हणविणारे अत्याचारी असतील तर ते अधर्मी वा दांभिक समजावे.
         एकत्व व समत्त्वाचा सिद्धांत विश्वाला देणाऱ्या धर्मात विषमत कशी असू शकेल! आणि जर दिसत असेल तर ती पाहणार्‍याच्या विषम दृष्टीमुळे ! त्यामुळे दोषारोपण करणाऱ्यांनी आपल्या बुद्धी बद्दल नक्की विचार करावा.
कल्पाच्या शेवटी प्रलयामध्ये स्वतः भगवान वेदाचं रक्षण करतात. आणि तोच पुरातन वेद पुढील सृष्टीमध्ये पुन्हा ऋषीमुनींच्या द्वारे प्रगट होतो. आणि हे चक्र अनादी आहे. अगदी त्याचप्रमाणे वेदाने जगाला दिलेला हा धर्म अनादि आहे. आणि त्या धर्माच्या रक्षणाकरता तदात्मानं सृजाम्यऽहं असे स्वतः भगवान अवतीर्ण होण्याचं आश्वासन देतात. त्यामुळे या बद्दलचा "सनातन" हा शब्द पुन्हा एकदा सार्थ होतो.
        हल्ली संपूर्ण जगाला याचं महत्व कळल्यानेच त्याच्याकडे प्रवृत्ती वाढते आहे. जगभरातले लोक कुठल्याही भीतीविना, प्रलोभनाशिवाय स्वखुशीने या मार्गात येत आहेत. आपणही याचे पाईक आहोत हे आपल्या सर्वांचे सद्भाग्य !
कारण जगातले सर्व मार्ग पंथ लयास जातील पण मात्र धर्म सनातन, शाश्वत आहे.
- ज्ञानदीपक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....