पोस्ट्स

हीच खरी "गुरू-दक्षिणा "

इमेज
वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक , स्वानंदसुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांनी सन १९१७ साली वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. ही केवळ एक शिक्षण संस्था नव्हे तर अध्यात्मज्ञानाची अविरत वाहणारी गंगाच म्हणावी लागेल !स्थापने नंतर एक शतक पूर्ण करुन दुसऱ्या शतकातही या ज्ञानगंगेचे वाहणे सुरुच आहे.          महाराष्ट्राची सांस्कृतिकता जपण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे.महाराष्ट्राच्या आणि वारकरी संप्रदायाच्या इतिहासात जोग महाराजांचे नाव सुवर्णाक्षरात कोरले जाईल.    तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे "पुर्व पुण्य ठेवा ओढवला " या न्यायाने व पूर्वजांच्या पुण्या ई ने या  ज्ञानगंगेत  ४ वर्षे गुरुजनांच्या सानिध्यात अवगाहन करण्याचा योग प्राप्त झाला.    संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथले आदर्श गुरुजन.  वैराग्य-भक्ती-ज्ञान या त्रिगुणांचा अंगीकार केलेली ही सर्व मंडळी. अगदी जोग महाराजांपासून तर सांप्रत कालच्या गुरुजनांपर्यंत सर्वच मंडळी हिमालयाच्या तोडीची  आहे.    या लेखाच्या निमित्ताने ...

तुका वैकूंठासी गेला....

इमेज
शूर ओळखावा रणी। साधू ओळखावा मरणी ।। - ही सूक्ति  आपण सर्वजण नेहमीच ऐकत असतो. अर्थात तिचा अर्थही तसाच महत्वपूर्ण आहे. एखाद्या शूराचं शूरत्व हे रणांगनातच कळत असतं. शूराला युद्ध स्थळी आलेलं मरण हे त्याच्या शूरपणाला साजेसं असतं. त्यातूनच त्याच्या शूरत्वाची ओळख ठरत असते. अगदी याचप्रमाणे साधू पुरुष ओळखायचा असेल तर तो त्याच्या अंत:समयावरुनच !        महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहेे. त्यातील सर्व संतांच्या अंत:समयाचा विचार करता सामान्य पुरुषांप्रमाणे त्यांचा अंतकाळ नाही तर तो अलौकिक अशा प्रकारचा महाराष्ट्रवासियांनी अनुभवलेला आहे. आणि तोच आपला यथार्थ इतिहास आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला, सोपान काकांनी सासवडला तर निवृत्तीनाथ महाराजांनी  त्र्यंबकेश्वरला  संजीवन समाधी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते.  तसेच मुक्ताई आकाशी लुप्त झाल्याचे संत वाङ्मयात दाखले आहेत.  संत नामदेवांच्या कुटुंबातील १४ जणांनी एकाच वेळी पांडुरंगाच्या महाद्वारी समाधी स्वीकारलेली आहे. चोखोबांची हाडं सुद्धा त्यांच्या मृत...

ज्ञानदेव: एक जीवन व्यवस्थापन गुरू

इमेज
अलंकापुर निवासी श्री ज्ञानदेव अर्थात संत ज्ञानेश्वर    माऊलींंची प्रतिभा अनाकलनीय आणि अवर्णनीय अशीच आहे.  ज्ञानदेवांच व्यक्तिमत्व त्यांच्या काळात व उत्तरकाळात अत्यंत लोकप्रिय झालेलं आपल्याला पाहायला मिळत. अगदी आजही   "ज्ञानदेव तुकाराम"   हा महामंत्र ज्ञानदेवांच्या लोकप्रियतेची साक्ष देतो. खरंतर माऊलींचं एका शब्दात वर्णन करायचं ठरलं तर   माउली म्हणजे महाराष्ट्राचं हृदयच होत.  म्हणून ज्ञानदेवांवर प्रेम करणाऱ्या तत्कालीन व उत्तरकालीन सर्व संतांना ज्ञानदेवांचं मुक्तकंठाने गुणगाण केल्याविना राहावलच नाही.     खरंतर ज्ञानदेवांचं व्यक्तिमत्व कुठल्याही शब्दांनी सांगता येण्यासारखं नाही. कारण तिथे कोणतेही शब्द कमीच पडतील ! कारण शब्दाला आणि शब्दज्ञानाला मर्यादा ठरलेलीच ठरलेलीच असते.  आणि ज्ञानदेव तर अमर्याद  असुन अत्यंत व्यापक आहेत.  आणि ही गोष्ट ज्ञानदेवांच्या काळातील तसेच उत्तर काळातील सर्व संतांनी मान्य केली. परंतु तरीही ते सर्व माऊलींचं वर्णन करण्यास उद्युक्त झाले. दशेची वाट न पाहता मुळात बालपणीच सर्वज्ञ  असलेले ...

शिक्षण क्षेत्रातील लढवय्या

इमेज
शिक्षणक्षेत्रातील लढवय्या....... प्रिय वाचक मित्रांनो,आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद परदेशी सर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. परदेशी सर म्हणजे एक लढवय्या, मेहनती, संशोधक, अंधश्रद्धा निर्मूलक, कर्तव्यपरायण, रंजल्या-गांजल्यांना आपलंसं करून त्यांना चांगल्या मार्गावर आणणारं अनंत गुणविशेषांनी नटलेलं व्यक्तिमत्व ! नेमके कोण आहे हे परदेशी सर ?  काय त्यांचं कार्य आहे ? यांच्याबद्दल जरा विस्ताराने जाणून घेऊ या ! * परीचय नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी या दुर्गम भागातील प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणजे प्रमोद परदेशी सर. मुळगाव कुसुंबा, तालुका जिल्हा धुळे. घरातच शिक्षकी पार्श्वभूमी लाभलेलं हे व्यक्तिमत्व. वडील जि. प. शाळेत मुख्याध्यापक व बहीणही शिक्षिका. यामुळे सहजच शिक्षकी पेशाकडे वळलेला हा तरूण. बारावीपर्यंत आपल्या मुळगावी शिक्षण घेऊन पुढे ठाण्यातील उल्हासनगर येथे नॅशनल कॉलेज मध्ये डी.एड. शिक्षण घेतले. 2002 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू. *दुर्गम भागात शिक्षक म्हणून कार्य करताना..... इगतपुरी पासून 14 किलोमीटर अंतर...

सॉक्रेटिसने सांगितलेलं सफलतेच रहस्य....

इमेज
या जगात जेव्हा तत्वज्ञानाचा विचार होतो तेव्हा पहिलं नाव समोर येतं ते युनानचा प्रसिद्ध तत्वज्ञ सॉक्रेटिस याचं. सॉक्रेटिस हा आपल्या प्रगल्भ विचार शैलीमुळे जगविख्यात आहे.... आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा त्याच्या आयुष्यातील प्रसंग सांगितला जातो.     सॉक्रेटिसची कीर्ती ऐकून एकदा एक युवक त्याच्याकडे आला आणि त्याने साक्रेटीस ला प्रश्न विचारला . गुरुजी ! आपल्या सफल रहस्य काय आहे ? मीसुद्धा आपल्यासारखाच यशस्वी होऊ इच्छितो ! मी तुमची सर्वच्या सर्व पुस्तके वाचले आहेत. तुम्ही सांगितलेल्या मार्गाचा मी स्वीकारही केला आहे पण तरीही मी आपल्या सारखा यशस्वी होऊ शकलो नाही. माझ्या मध्येच काही कमीपणा तर नाही ना ? मला  सफल  का होता येत नाहीये?  त्यावर सॉक्रेटिस म्हणाला उद्या जवळच्या नदीकाठावर ये! मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर सांगतो.           तो युवक दुसऱ्या दिवशी उत्साहाने नदीच्या किनाऱ्यावर आला. सॉक्रेटिस त्याला म्हणाला - चल आपण नदीत स्नान करू या! तेव्हा तरुण म्हणतो - गुरुजी ! मी  स्नान करण्यासाठी नाही आलो ...

!! गणेशोत्सवाचा विपर्यास !!

इमेज
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दैदिप्यमान आणि अमूल्य रत्न म्हणून आपण सर्वजण ज्यांना ओळखतो असे लोकमान्य टिळक .लोकमान्यांनी इंग्रजी शासनाला उलथून पाडण्यासाठी सामाजिक ऐक्य व जनजागृती निर्माण व्हावी तसेच समाजात ब्रिटिश सरकारविरुद्ध लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा याकरिता पारंपरिक गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले . हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे    पण टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचा स्वातंत्र्यानंतर विपर्यास व्हायला सुरुवात झाली.त्या विपर्यास सर्वोच्च  दर्शन म्हणून आपल्याला हल्लीच्या  गणेशोत्सवाकडे पाहता येईल.    लोकमान्यांचा  या उत्सवामागील हेतू स्वातंत्र्य प्राप्तीच्या इच्छेने जनजागृती व सामाजिक ऐक्य होता तर सद्या आम्ही फक्त गतानुगतिको लोक: न पारमार्थिक: या न्यायानेच तो साजरा करतोय.    तत्कालीन उत्सवाचं स्वरूप आणि सांप्रत कालीन उत्सवाचं स्वरूप यात जमीन आसमान एवढी तफावत पाहायला मिळते. पूर्वी गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने व कमी खर्चात साजरा करण्यात येत असे .त्यात सांस्कृतिकता सामाजिकता नैतिकता यांना महत्त्वाचे स्थान होते....

गोदावरी नदी ( दक्षिण गंगा ) की अवतरण कथा...

इमेज
गोदावरी नदी का पौराणिक महत्व और अवतरण कथा भारत की संस्कृति में साधू संतो , देवी देवताओ के साथ प्राकृतिक चीजो का भी बहुत पौराणिक महत्व रहा है | हमारे शास्त्रों में इनके लिए कई धार्मिक प्रसंग आये है |  भारत की पवित्र नदियाँ  ,  भारत के धार्मिक पर्वत  भी अपने प्रसंगों और कथाओ के कारण पूजनीय रहे है | आज इसी सन्दर्भ में हम आपको गोदावरी नदी की महिमा के बारे में बताने जा रहे है | आप इस पोस्ट में जानेंगे कि कैसे माँ गोदावरी धरती पर आई और इसके पीछे कौनसी कथा शास्त्रों में बताई गयी है | गोदावरी नदी का संक्षिप्त परिचय  : गोदावरी नदी को दक्षिण भारत की गंगा कहा जाता है | इसका नामकरण भी महा तपस्वी गौतम ऋषि की महातपस्या के कारण हुआ था | अत: उन्ही के नाम पर इस पवित्र नदी का नाम गोदावरी रखा गया | यह नदी लगभग 1440 कि.मी. की है जो दक्षिण भारत में पश्चिमी घाट से लेकर पूर्वी घाट तक प्रवाहित होती है | यह महाराष्ट, तेलंगना और आंध्र प्रदेश से बहते हुए राजहमुन्द्री शहर के निकट से बंगाल की खाड़ी मे जाकर मिलती है। गोदावरी नदी की काफी गहराई है। इसकी औसत गहराई 17 फीट और अधिकतम गहराई 62 फीट ...