पोस्ट्स

मया अनुभूता संवादशाला

इमेज
हरि:ॐ l नमो नमः l भो मित्राणि कथं सन्ति सर्वे ? सर्वे सम्यक् भविष्यन्ति इति अहं चिन्तयामि lअहं गत'मेमासे देहलीसंवादशालां गतवान् आसम् l तंत्र अहं यत् अनुभूतवान् तस्य कथनम् अहं अधुना करोति l सर्वस्मात्पूर्वं अहं तंत्र किमर्थं गतवान् ? तंत्र गमनस्य कारणं किम् ? तं कारणं अहं वदामि l  अहं आलंद्यां आगत्य जोगमहाराजवारकरीशिक्षणसंस्थायां प्रवेशं कृतवान् l तत्र प्रथमेवर्षे "भांडारकर"नाम्न:संस्कृतव्याकरणस्य पुस्तकं पठितवान् l तेन व्याकरणपठणेन मम मनसि संस्कृतविषये रुचि: उत्पन्ना जाता l अनन्तरं यदा अहं संस्थायां द्वितीये वर्षे पठन् आसम् , तदा पुणेनगरे विद्यमाने टिळकमहाराष्ट्रविद्यापीठे बी.ए.संस्कृतअभ्यासक्रमाय प्रवेशं कृतवान् l तत्र त्रय:वर्षात् पदवीं प्राप्तवान् l पश्चात् मुंबई विद्यापीठस्य चेंबूरसर्वंकषशिक्षणशास्त्रमहाविद्यालये शिक्षाशास्त्रीं तथा बी.एड अपि पूर्णं कृतवान् lअहं संस्कृत अध्यापक अभवम् lकिन्तु सम्यकतया संस्कृतेन वक्तुं समर्थ: न आसम् lअहं संस्कृतभाषाशिक्षक: सन् अपि तां भाषां वक्तुं असमर्थ: आसम् तेन मम मनसि खेद: जायमान: आसीत् l   मया तद्विषये चिंत

वेद मार्गे मुनी गेले....

इमेज
वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालीलो ! भारतीय इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू धर्मावर परकीय परधर्मीयांची आक्रमणं झाली. बरेचदा अन्याय-अत्याचार किंवा प्रलोभन देऊन हिंदू धर्मियांच्या धर्मांतरासाठी अनेक प्रयत्न झाले.                                           समाज सुधारणेच्या नावाखाली तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली तथाकथित धर्मसुधारकांनी व पुरोगाम्यांनी हिंदू धर्म साकल्याने जाणून न घेता आपल्या अर्धवट बूद्धीद्वारे दोष देण्याचे काम केले.     या परधर्माच्या व नास्तिकतेच्या वावटळातही वेदानुसारी असलेला हा धर्म दीपज्योतीवत् दीप्तीमान राहीला. वेदाप्रमाणेच अनंत काळापासून प्रवाही आहे. आणि पुढेही प्रवाही राहील! म्हणूनच त्यासाठी सनातन हा शब्द वापरला आहे. त्या शब्दातच त्याचं शाश्वतत्व टिकून आहे.         "सर्वे भद्राणि पश्यन्तु" द्वारे सर्व मानवजातीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या या धर्माने कधीही धर्मवृद्धीसाठी अन्याय - अत्याचार व प्रलोभनाचं धोरणही स्विकारलं नाही. पण ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली त्यावेळेस  शिवबा राणाप्रतापांसारखे अ

सेवेलागी सेवक झालो.....

इमेज
  सेवेलागी सेवक झालो..      महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात दत्त जयंती निमित्ताने वेगवेगळे अध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आमच्या योगवेदांत आश्रमात येणाऱ्या कोकणातील काही मंडळींनी मला काही दिवसांपूर्वी किर्तन सेवेकरिता पाचारण केलं.तसेच मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरलेला होता. असं वाटलं नव्हतं की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि कीर्तनाचा कार्यक्रम एकाच दिवशी येईल. आणि नेमकं तेच झालं. ज्या दिवशी कीर्तन सेवा होती त्याच दिवशी सीटेटचा पेपर आला.आता माझ्यासाठी परीक्षा ही महत्त्वाची होती. आणि कीर्तन सुद्धा. भावी जीवनासाठी परीक्षा तर वारकरी सांप्रदायिक सेवा म्हणून कीर्तन महत्त्वाचे ! एक प्रकारच्या कात्रीत सापडल्यासारखं झालं.  मी असा विचार केला की दोन्ही पेपर कसेबसे पूर्ण करून कीर्तन सेवेकरीता जायचं. परंतु दुसऱ्या पेपरची वेळ दु.२:३०ते ५ अशी होती. त्यामुळे पुण्यातून आळंदीला येऊन पून्हा चाकण आळेफाटा व ओतूर या मार्गाने मुंबईकडे जायचं होतं. आणि हे सगळं वाहतूक कोंडीचा विचार करता अशक्य होतं. मी कीर्तन सेवा ही

गीताई माऊली माझी

इमेज
आज गीता जयंती (५१४१वी)..     "गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता l         पडता रडता उचलूनी घेई कडेवरी ll" श्रीमद्भगवद्गीता हे मानवी जीवनाचे सार आहे. जिचे पठण अध्ययन केल्यानंतर आपल्याला योग्य मार्ग निश्चितच आपल्या जीवनामध्ये मिळू शकतो. गीतेचे महत्व टिकून राहावे यासाठीच आपल्या भारतीयांमध्ये गीता जयंती साजरी केली जाते . सनातन हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ग्रंथाची जयंती म्हणजेच गीताजयंती होय. भगवद्गीता हा जीवन मंत्र आहे , म्हणूनच हजारो वर्षांपासून मानवाला पथप्रदर्शन करीत आला आहे. आणि म्हणूनच याला अत्याधिक पवित्र ग्रंथ मानले जाते.       "भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्र मध्ये अर्जुनाचा मोह निवृत्त होण्याकरता केलेला उपदेश होय." अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये , आपल्या नातेवाईकांना पाहिल्यानंतर मोहग्रस्त होतो आणि अशा मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाचा मोह निवृत्त व्हावा म्हणून भगवान जो उपदेश करतात तो गीता होय आणि भगवंतांनी हा उपदेश ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे "मार्गशीर्ष शुक्ल एकादशी" अर्थात मोक्षदा एका

आपण काय शिकलो ?

इमेज
मी माझी दिवाळी आळंदीत आल्यापासून माऊलींच्या सानिध्यातच साजरी करतो. त्यामुळे दिवाळीला गावी जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण यावर्षी दिवाळीच्या अगोदर गााावातील एक व्यक्ती मयत झाल्याने दशक्रिया विधीसाठी गावी गेलो होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर लगेच काल सकाळी मी आळंदीला येण्यासाठी कोपरगावच्या बसस्थानकावर आलो. तिथे आल्यानंतर सुसज्ज आणि सुव्यवस्थित बांधलेलं भव्य बसस्थानक पाहून आनंद वाटला. पण नंतर हा विचार मनात आला की सध्याच्या परिस्थितीत बरेच एसटी कर्मचारी हलाखीचे जीवन जगत आहेत. पगाराच्या व वेतन वाढीच्या समस्यांमुळे त्रस्त होऊन आत्महत्या हत्येसारख्या  प्रवृत्त होताना दिसत आहे. मग बसस्थानकांची काम कशी सुरू आहेत ? ज्यांच्या खांद्यावर राज्य परिवहन महामंडळाची धुरा असते अशा कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष का?          असो...   मी सकाळी ९ च्या सुमारास कोपरगाव आगाराच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत बसलो. दिवाळीचा काळ असल्याने कोपरगावलाच गाडी पूर्ण भरली. पुढे शिर्डी, बाबळेश्वर, लोणी असे एक-एक स्थानक गाडी पुढे जात असताना प्रत्येक स्थानकावर  गाडीत प्रवासी चढल्याने गाडीत पाय ठेवायलाही जागा शि

बोधसंपन्न रामचंद्र बाबा बोधे.....

इमेज
प.पू.श्रीगुरु रामचंद्र बाबा बोधे यांचा पुण्यतिथी सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी साजरा करत आहे. त्यानिमित्ताने बाबांच्या चरणी शब्द कुसुमांजली... मी २०१५ साठी पंढरपूरला चातुर्मासात होतो.श्रीगुरू बोधे बाबांच्या मठात वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य श्रीगुरु वै.निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांचे प्रवचन सुरू होते. वक्ते  बाबांनी प्रवचनासाठी                   महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: l         भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम् ll हा गीतेतील श्लोक निवडला. सदर प्रसंगी बाबांनी श्लोकातील "महात्मा" या पदाला प्राधान्य देऊन संपूर्ण प्रवचन केले. त्यावेळेच वक्ते बाबांचं एक वाक्य याठिकाणी उद्धृत करावसं वाटतं... "हल्ली लोक कुणालाही महात्मा म्हणतात पण खरा महात्मा आमचे बोधे बाबा आहेत;कि जे दैवी सद्गुण संपत्तीने युक्त आहेत." श्रीगुरु बोधे बाबांना ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल, ज्यांनी ज्यांनी त्यांच्या सहवासात काल घालवला असेल, त्या त्या प्रत्येकाला आपलं जीवन सार्थकी लागल्याचा नक्की अभिमान वाटत असेल ! आपल्या रामचंद्र या शुभ नावांन

सार्थ पाण्डुरङ्गाष्टकम्

इमेज
।।पाण्डुरङ्गाष्टकम्।।  महायोगपीठे तटे भीमरथ्या  वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।1।         महायोगाचे अधिष्ठान (पीठ), भीमा नदीच्या तीरावर ज्याला पंढरपुर क्षेत्र म्हणतात अशा क्षेत्री आई वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी , अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्म रूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. तडिद्वाससं नीलमेघावभासं    रमामन्दिरं सुंदरं चित्प्रकाशम्। वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुगम्।2।         विद्युल्लतेसम अतीशय शोभिवंत असे वस्त्रे नेसणार्‍या,नीळ्यारंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या अंगकांतीच्या , लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या,परम सुंदर चित्प्रकाशी,सर्वश्रेष्ठ तसेच भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून अभा आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्। विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोषः परब्रह्म लिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्।3।           पांडुरंग आपल्या भक्तांना दर्शवतात की मला शरण ये